महाराष्ट्रात कांद्याची दर कोसळण्याचे कारण
महाराष्ट्र टाइम्स कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याची आवक कमी असून देखील कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली पहायला मिळाली मागील तीन महिन्यापूर्वी 40 रुपये प्रति किलो या दराने विकला जाणारा कांदा आता तब्बल 19 रुपये प्रतिकिलो आला आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा अत्यंत वेगाने कोसळत आहे मात्र हा कोसळणार दर शेतकऱ्यांच्या काळजाचे पाणी करत असून आता पुढे काय करायचे ? असा मोठा प्रश्न शेतकर्यांपुढे उभा राहिला आहे . मागील एक महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची कमी-अधिक स्वरूपात आवक असल्याने कांद्याच्या दरात किरकोळ चढ-उतार सुरू होता व दर 30 ते 40 रुपयांच्या दरम्यान स्थिरावलेले असायचे मात्र गुरुवारी आवक कमी झाली असून कांद्याचे दर वाढलेच नाही महाराष्ट्रातील कांदा गुजरात , तमिळ, कर्नाटक, राजस्थान इत्यादी राज्यात निर्यात केला जातो मात्र सध्या या भागातील स्थानिक कांदा बाजारपेठ आल्याने आपल्या कांद्याचा उठाव कमी झाला आहे परिणाम महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाल्याने व्यापारी वर्ग कांदा खरेदी करत नाही त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी ...