फास्टॅगद्वारे महागड्या टोलपासून बचावासाठी काढला असा जुगाड की अधिकारीही झाले हैराण...
Kay highlights
• सरकारने देशभरात १५ फेब्रुवारीपासून फास्टॅग गरजेचा केला आहे.• जर तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर तुम्हाला टोल प्लाझावर डबल टॅक्स अथवा दंड भरावा लागेल
• लोकांनी महागड्या टोलपासून सुटका मिळवण्यासाठी जुगाड शोधून काढला आहे
___________________________________________
महाराष्ट्र टाइम्स : लोकांना टोलबूथवरील(tollbooth) लांबच लांब रांगापासून सुटका मिळावी तसेच त्यांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात १५ फेब्रुवारीपासून फास्टॅग(fastag) गरजेचे केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि दुप्पट टोल भरावा लागतो. सरकारला आशा आहे की यामुळे लोकांचा रांगामधील त्रास कमी होईल तसेच रेव्हेन्यूमध्येही फायदा होईल. मात्र काही जुगाड करणाऱ्यांनी यातूनही पळून जाण्याचा मार्ग शोधून काढला आहे. यामुळे सरकारला लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते.
💁तपासादरम्यान समोर आली बाब
पत्रिकेच्या बातमीनुसार राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा याबाबत तपास केला तेव्हा ते हैराण झाले. तपासात समजले की टोल पार करणारी गाडी वेगळीच आहे आणि फास्टॅग कोणत्या वेगळ्याच गाडीचा आहे. दरम्यान, हे प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आले आहे. मात्र सरकारला शंका आहे की दुसऱ्या राज्यांमध्येही असे केले जाऊ शकते. प्रकरण समोर येताच अधिकाऱ्यांनी याबाबतचा तपास अधिक वेगाने सुरू केला.
💁मोठमोठ्या गाड्यांवर छोट्या गाड्यांचा फास्टॅग
खरंतर, टोल प्लाझावर छोट्या वाहनांपासून ते मोठ्या वाहनांवर वेगवेगळा टोल आकारला जातो. जेव्हा फास्टॅग गरजेचा करण्यात आला तेव्हा जसे तुमची गाडी टोल प्लाझावर येथे तेव्हा तेथे लावलेला सेन्सर तुमच्या गाडीच्या विंडस्क्रीनवर लावलेला फास्टॅग ट्रॅक करतो. यानंतर फास्टॅग अकाऊंटमधून त्या टोल प्लाझावर आकारण्यात येणारी रक्कम कापली जाते. हे जुगाड करणारे गुन्हेगार फास्टॅगचा वापर मोठ्या चतुराईने करत आहेत.
मोठ्या गाड्यांना टोल पार करण्यासाठी छोट्या गाडीचा फास्टॅग लावला जात आहे. अशातच ते साधारण ३०० ते ५०० पर्यंत टॅक्स चोरी करतात ज्यामुळे सरकारच्या तिजोरीतील लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. फास्टॅग जारी झाल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी पुढील पाच वर्षांपर्यंत असते. जर तुम्ही रिचार्ज केला आणि बराच काळ गाडी चालवली नाही तरी रिचार्जवर काही फरक पडत नाही. हे रिचार्जही फास्टॅगची व्हॅलिडिटी असेपर्यंत कायम असते.

टिप्पणियाँ