संदेश

फ़रवरी, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Red Banana Benefit : कर्करोग आणि हृदयविकाराच्या समस्यांपासून दूर ठेवण्यात प्रभावी ‘लाल केळे’, जाणून घ्या फायदे

चित्र
आतापर्यंत तुम्ही पिवळ्या आणि हिरव्या रंगाची केळी खाल्ली असतील, परंतु तुम्ही कधी लाल रंगाची केळी पहिली आहेत का? कदाचित नसतील. परंतु, आज आपण लाल केळींबद्दल जाणून घेणार आहोत. Red banana मुंबई : जर तुमचा आहार चांगला असेल, तर तुमचे आरोग्यही चांगले राहते. आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. चांगल्या आरोग्यासाठी, आपण अधिकाधिक फळांचे सेवन करतो, ज्यामध्ये केळीचा देखील समावेश आहे. केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये बरेच पोषक घटक देखील असतात, जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करतात. केळी हे जगभरात खाल्ले जाणारे फळ आहे (Health benefits of Red Banana). केळी सर्वांनाच खूप आवडतात. आतापर्यंत तुम्ही पिवळ्या आणि हिरव्या रंगाची केळी खाल्ली असतील, परंतु तुम्ही कधी लाल रंगाची केळी पहिली आहेत का? कदाचित नसतील. परंतु, आज आपण लाल केळींबद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्ये लाल रंगाची केळी पिकवली जातात. या केळीला ‘रेड डक्का’ही म्हणतात. चला तर, या लाल केळीचे आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांविषयी जाणून घेऊया लाल केळ्यामुळे आरोग्यास होणारे फायदे 💁रक्त गठ्ठा गोठत नाही . ...

अमिताभ बच्चन यांची प्रकृती अस्थिर

चित्र
  बिग बींचे चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहे. मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या साता समुद्रा पार पसरलेली आहे. अभिनयातले बिग बी आणि खऱ्या आयुष्यातील बिग बी हे दोन्ही पात्र चाहत्यांच्या फार जवळचे आहेत. पण आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. बिग बींची परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांना नक्की काय झालं आहे? त्यांना कोणत्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे बिग बीच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे महत्त्वाचं म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शनिवारी रात्री त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर बिग बींचे चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहे.   ब्लॉकच्या माध्यमातून सांगत त्यांनी प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. बिग बीचं हे छोटं वाक्य चाहत्यांच्या मनातील चि...

भारताला मोठा धक्का, ट्वेन्टी-२० संघातून हा खेळाडू होऊ शकतो बाहेर.

चित्र
  भारतीय संघाला ट्वेन्टी-२० मालिका सुरु होण्यापूर्वीच एक धक्का बसला आहे. कारण भारताच्या संभाव्य संघातील एक खेळाडू आता बाहेर होऊ शकतो, असे पाहायला मिळाले आहे. हा खेळाडू नेमका कोणत्या कारणांमुळे संघाबाहेर होऊ शकतो, अहमदाबाद, IND vs ENG : कसोटी मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघातील एक खेळाडू बाहेर होऊ शकतो आणि त्यामुळे भारतीय संघाला अजून एक धक्का बसू शकतो . इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची फिटनेस चाचणी बीसीसीआय घेत आहे. पण भारताचा एक खेळाडू या फिटनेस चाचणीत नापास झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या खेळाडूला संघातून वगळण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. गेल्या आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीने कमाल केली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठीही निवडण्यात आले होते. पण त्यावेळी वरुणच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. पण आता इंग्लंडविरुद्ध...

Maharashtra Board SSC and HSC Exam Time Table : मोठी बातमी! इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा

चित्र
  Maharashtra Board Exam Time Table and Result Date 2021 MSBSHSE : इयत्ता १० वी (SS C Exam) आणि इयत्ता १२ वी (HSC Exam) परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर Maharashtra Board SSC and HSC Exam Time Table : मोठी बातमी! इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा Maharashtra HSC and SSC Board Exam Time Table 2021 : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा होणार की नाही अशी शंका निर्माण झाली असतानाच शिक्षण विभागानं अखेर आज वेळापत्रक जाहीर केलं आहे. संभाव्य वेळापत्रकासाठी २२ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या सर्व सुचनांचा विचार करुन अखेर इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  कोविड-१९ च्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करुनच परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.  १० वीची परीक्षा केव्हा? (SSC Exam Schedule)इयत्ता १० वीची (SSC Exam) लेखी पर...

आता पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले ‘कारण

चित्र
 सध्या हिवाळा असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. हिवाळ्यात असे होतच असते. हिवाळा संपल्यानंतर किमती पुन्हा खाली उतरतील, असंही पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणालेत. Maharashtra Times 29 February 2021   काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरूनच विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय. सध्या हिवाळा असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. हिवाळ्यात असे होतच असते. हिवाळा संपल्यानंतर किमती पुन्हा खाली उतरतील, असंही पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणालेत. (Dharmendra Pradhan Says Petrol Diesel Price Become Costly In Winters) आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीचा ग्राहकांवर परिणाम पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वृत्तसंस्था एएनआयला ही माहिती दिलीय. प्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीचा ग्राहकांवर प...

ऋषभ पंतने अक्षर पटेलला ‘वसीम भाई’ असं का पुकारलं? ऋषभ आणि रहाणेचं रहस्य उलगडलं

चित्र
  ______________________________________________ ______________________________________________ हमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या टेस्ट मॅच (India vs England, 3rd Test) दरम्यान ऋषभ पंत सतत अक्षर पटेलला (Axar Patel) ‘वसीम भाई’ (Wasim Bhai) अशी हाक मारताना दिसला. _____________________________________________ Maharashtra Times, 26 फेब्रुवारी:   टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या आक्रमक बॅटिंगसोबतच उत्कृष्ट विकेट कीपिंग आणि स्टंम्पमागून सुरू असलेल्या अखंड कॉमेंट्रीमुळेही नेहमीच चर्चेत असतो. सामन्या दरम्यान ऋषभ पंत स्टंपच्या मागून मजेशीर कॉमेंट्री करत असतो, त्यामुळं सहकारी खेळाडू आणि चाहत्यांचंही चांगलंच मनोरंजन होत असतं. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या टेस्ट मॅच (India vs England, 3rd Test) दरम्यान ऋषभ पंत सतत अक्षर पटेलला ( Axar Patel ) ‘वसीम भाई’ ( Wasim Bhai ) अशी हाक मारताना दिसला. त्याचं हे हाक मारणं स्टंप माईकमध्येही रेकॉर्ड झालं आहे. ऋषभ पंत अक्षर पटेलला वसीम भ...

आता तुमचा मोबाईल होणार अधिक स्मार्ट; Googleने आणलं नवं फिचर

चित्र
  नवी दिल्ली : आजच्या या धावपळीच्या विश्वात प्रत्येक जण स्मार्ट फोनचा वापर करतो. पण आता तुमचा हा स्मार्ट फोन आणखी स्मार्ट होणार आहे. Googleने त्यांच्या युजर्ससाठी नवीन फिचर आणलं आहे. आता लवकरच तुम्ही तुमचा SMS शेड्यूल करू शकता. शिवाय Google Assistant वापरण्याची नवी पद्धत लवकरच लँच होणार आहे. त्यामुळे आता स्मार्ट फोन वापरकर्त्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.  Google आता SMS करण्याची पद्धत आहे ती बदलणार आहे. Google त्यांच्या ऑफिशियल ब्लॉगमध्ये संबंधीत माहिती दिली आहे. नवीन फिचर आल्यानंतर तुम्ही SMS शेड्यूल करू शकता. म्हणजे आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि ठरावीक वेळ शेड्यूल करून SMS करू शकता.  यापूर्वी SMS टाईप केल्यानंतर लगेच समोरच्या व्यक्तीला SMS पाठवता येत होता. पण नव्या फिचरमुळे ठरावीक वेळ लावून SMS पाठवता येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला मित्रांना, कुटुंबातील व्यक्तींना किंवा ऑफिसमध्ये SMS पाठवायचा असल्यास नवा फिचर अत्यंत उपयोगी ठरणार आहे.  Google एंड्रॉयड फोनमध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. आता तुम्ही लॉक एंड्रॉयड फोनमध्ये देखील Google Assistantचा वापर करू ...

Ind vs Eng: चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल गोलंदाजाने सामन्यातून घेतली माघार

चित्र
  अहमदाबाद - अहमदाबादमध्ये झालेली दिवस-रात्र कसोटी जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील अव्वल गोलंदाजाने वैयक्तिक कारणांमुळे चौथ्या सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता चौथ्या कसोटीसाठी भारताला नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे.  भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. काही वैयक्तिक कारणास्तव बुमराहने या सामन्यामधून माघार घेतली आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयला विनंती केली आहे. दरम्यान, बुमराहच्या जागी भारतीय संघात नव्या खेळाडूचा समावेस करण्यात आलेला नाही. आता चौथ्या कसोटी सामन्यासाठी जसप्रित बुमराहच्या जागी इशांत शर्मा किंवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकते.   भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ४ ते ८ मार्चदरम्यान खे...

India vs England T20 squad

चित्र
  India versus England 2021 T20 full squad •Virat Kohli (C) •Rohit Sharma ( vc ) •Shikhar Dhawan •Shreyas Iyer • Suryakumar Yadav Wicket keeper batsman • Ishan Kishan. (wk ) •Rishabh pant (wk) •Kl Rahul (wk) All rounder •Hardik Pandya •Washington Sundar •A Patel •Shardul Thakur • Rahul tewatia Bowler • Bhuvneshwar Kumar •U chahal •T Natarajan • Varun Chakravarthy •Navdeep Saini •Deepak. Chahar ताज्या  बातम्यांसाठी 9405163506 हा नंबर आपल्या ग्रुपमध्ये add करा Ads by Eonads

खरंच महाराष्ट्रात १ मार्चपासून लॉकडाउन लागणार आहे का?

चित्र
 महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारीला राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. म्हणजेच १ मार्चला लॉकडाउन लावायचा की नाही यासंबंधी उद्धव ठाकरे निर्णय़ जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर लॉकडाउनची अफवा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर सध्या एक स्क्रिनशॉट व्हायरल झाला आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. एका वृत्तवाहिनीच्या लोगोसहित असलेला उद्धव ठाकरेंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. अनेकजण एकमेकांना फोन, मेसेज करुन यासंबंधी विचारणाही करत आहेत. मात्र हे वृत्त पूर्णपणे खोटं असून उद्धव ठाकरेंनी असा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. बनावट फोटो फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर अशा अनेक ठिकाणी व्हायरल झाला आहे. राज्यातील रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत हे खर...

१८ तासांमध्ये २५ किमी लांबीचा डांबरी रस्ता; गडकरींचं खातं थेट लिम्का बुकात

चित्र
  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोकठोक मतप्रदर्शनाबरोबरच कामासाठीही ओळखले जातात. आपल्या खात्याअंतर्गत सतत काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा गडकरींचा प्रयत्न असतो. अशाच एका आगळ्यावेगळ्या प्रयत्नाला नुकतचं यश आलं असून त्याची दखल थेट 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'कडून घेतली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच सोलापूर ते विजापूर या मार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाअंतर्गत २५.५४ किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचे डांबरीकरण केलं. विशेष म्हणजे हे डांबरीकरण अवघ्या १८ तासांमध्ये करण्यात आलं आहे. याची दखल थेट 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतली असून या कामाची लिम्का बुककडून नोंद घेतली जाणार आहे.  १८ तासांमध्ये २५ किमीहून अधिक लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामात ५०० कर्मचारी सहभागी झाले होते. ठेकेदाराच्या कंपनीने हे काम करुन दाखवल्याबद्दल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या या परियोजनेचे निर्देशक, अधिकारी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधिक आणि या योजनेतील सर्व अधिकाऱ्यांचेही...

दहावी, बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही : वर्षा गायकवाड

चित्र
  दहावी, बारावीची परीक्षा रद्द झाल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नाही. अशाप्रकारची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही," असं स्पष्टीकरण राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांना दहावीच्या परीक्षा होणार नसल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितं. तसंच विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. तामिळनाडू सरकराने राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तशाच प्रकारचा निर्णय महाराष्ट्रात घेतला जाऊ शकतो, असे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्याचे वृत्त प्रसारित झालं होतं. परंतु एबीपी माझाशी बोलत...

HSC and SSC board exam | दहावी, बारावी बोर्डाचे अंतिम वेळापत्रक जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

चित्र
    राज्यातील  वाढता  कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, राज्य मंडळाकडून 16 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या मतानांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले.  त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले . राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून मत  मागवण्यात आले होते. त्यानुसार आलेल्या मतांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे ...