महाराष्ट्रात कांद्याची दर कोसळण्याचे कारण

 



महाराष्ट्र टाइम्स 

कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याची आवक कमी असून देखील कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली पहायला मिळाली

मागील तीन महिन्यापूर्वी 40 रुपये प्रति किलो या दराने विकला जाणारा कांदा आता तब्बल 19 रुपये प्रतिकिलो आला आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा अत्यंत वेगाने कोसळत आहे

मात्र हा कोसळणार दर शेतकऱ्यांच्या काळजाचे पाणी करत असून आता पुढे काय करायचे ? असा मोठा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा राहिला आहे .

मागील एक महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची कमी-अधिक स्वरूपात आवक असल्याने कांद्याच्या दरात किरकोळ चढ-उतार सुरू होता व दर 30 ते 40 रुपयांच्या दरम्यान स्थिरावलेले असायचे

मात्र गुरुवारी आवक कमी झाली असून कांद्याचे दर वाढलेच नाही महाराष्ट्रातील कांदा गुजरात , तमिळ, कर्नाटक, राजस्थान इत्यादी राज्यात निर्यात केला जातो

मात्र सध्या या भागातील स्थानिक कांदा बाजारपेठ आल्याने आपल्या  कांद्याचा उठाव कमी झाला आहे परिणाम महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाल्याने व्यापारी वर्ग कांदा खरेदी करत नाही

त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली मात्र उठावात नसल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत गुरुवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांदा 19 ते 40 रुपये या दराने विकला गेला

मागील काही दिवसात कांद्याला मिळत असलेली उच्चांक दर पाहता पुढे हे दर असेच टिकून राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती

मात्र आज या लिलावात कांद्याचे कमी दर मिळाल्याने आता चांगले दर मिळण्याच्या आशेने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केलेल्या  शेतकऱ्यांची आशा कमी होऊ लागले आहे.




टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

अहमदनगर मधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्हा प्रशासनासह बैठक

शेतकऱ्यांचे असणारी स्कीम बाबत आता मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल यांचा शेतकऱ्यांना होईल फायदा

ह्या दिवसाच्या आधी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात