सचिन, सेहवागने पुन्हा गाजवलं मैदान; 10 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने जिंकली मॅच
Road Safety World Series: सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागने नेहमीच्या जोशात मैदानावर उतरले आणि अवघ्या 10 ओव्हर्समध्येच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारताला सामना जिंकून दिला. जुन्या दिवसांची पुन्हा आठवण झाली.
महाराष्ट्र टाइम्स 6 मार्च 2019
Team India चे दिग्गज पुन्हा एकदा मैदान गाजवताना आज पाहायला मिळाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin tendulkar playing again) खेळताना पाहून आणि वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) त्याच धडाकेबाज सुसाट बॅटिंगने प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. रस्ते सुरक्षा विश्व मालिकेच्या (Road Safety World Series)निमित्ताने बांग्लादेश लीजंड्सविरुद्ध खेळायला साक्षात क्रिकेटचा देव पुन्हा एकदा मैदानात खेळण्यासाठी उतरला. त्या 10 नंबरच्या जर्सीला पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना पाहून फॅन्सना पुन्हा एकदा जोष चढला. बांग्लादेशचा 9 गडी राखून या दिग्गजांनी पराभव केला.
या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये India Legends विरुद्ध बांग्लादेश लीजंड्स असा सामना शुक्रवारी रंगला. बांग्लादेशने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सगळी टीम 109 धावांत गारद झाली. त्यानंतर फलंदाजीस भारतीय संघ उतरला. वीरेंद्र सेहवागने नेहमीच्या जोशात 35 चेंडूत 80 रन्स काढल्या. त्याचे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला
10 फोर आणि 5 सिक्सर ठोकलेल्या पाहून प्रेक्षक खूश झाले. सचिन तेंडुलकरनेही त्याला छान साथ दिली. 26 बॉल्समध्ये 33 रन्स सचिनने काढल्या. या दोघांनीच ही मॅच भारताला जिंकून दिली.
आता या वर्ल्ड सीरिजमध्ये 6 मार्चला श्रीलंका लीजंड्स आणि वेस्ट इंडिज लीजंड्स या संघांदरम्यान मॅच होईल. 1996 मधील विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला अजिंक्यपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा आक्रमक सलामीवीर सनथ जयसूर्या (Sanath Jaysurya) श्रीलंका लीजंड्स संघाकडून मैदानात उतरणार आहे.
या स्पर्धेतील सर्व मॅचेस रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर होतील. देशात रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने या टी 20 मॅचेस खेळल्या जाणार आहेत. कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) या स्पर्धेतील पहिलं सत्र 4 मॅचेसनंतर 11 मार्चला तहकूब करण्यात आलं होतं.
_____________________________________________
India legends vs Bangladesh legend
Scorecard
Bangladesh batting





टिप्पणियाँ